शिक्षकांनी स्वतःच्या मुलांप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवण द्यायला हवी

माध्यमिक विद्यालय तांदलवाडी शाळेत दीपस्तंभ फाउंडेशनचे जळगांव येथील प्रा.यजुर्वेंद्र महाजन यांचा सत्कार


Prof. Yajurvendra Mahajan of Jalgaon was felicitated by Dipstambh Foundation in Secondary School Tandalwadi School खिर्डी : शिक्षण कमी असले तरी चालेल पण आयुष्य उत्तम प्रकारे जगता यायला हवे. शारीरिक अपंगत्वावर मात करून सुद्धा आपल्या जीवनात सुखी आयुष्य कसे जगता येईल तसेच नुसत्या नोकरी या मागे न लागता शेती असो किंवा इतर कोणताही व्यवसाय सुध्दा करता आला पाहिजे. शिक्षकांनी सुद्धा समाजातील बदलांप्रमाणे बदलून आपल्या स्वतःच्या मुलांप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकवण दिली पाहिजे, असे मत दीपस्तंभ फाउंडेशनचे प्रा.यजुर्वेंद्र महाजन यांनी येथे व्यक्त केले. माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज जळगावच्या दीपस्तंभ फाउंडेशनचे प्रा.यजुर्वेंद्र महाजन सत्कार प्रसंगी बोलत होते. भारत सरकारचा सन 2023 सालचा दिव्यांग विद्यार्थी सक्षमीकरणाचे उत्कृष्ट कार्य करणारी संस्था म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानीत करण्यात आल्यानंतर प्रा.महाजन यांचा सन्मान करण्यात आला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
सन्मानपत्र लेखनाचे कार्य माध्यमिक विद्यालयाचे शाळेचे पर्यवेक्षक एस.आर.पाटील यांनी केले होते. अल्पसंख्यांक विकास विभागाचे तडवी, शाळेचे अध्यक्ष के.जी.महाजन, चेअरमन राजाराम महाजन, व्हा.चेअरमन मुकेश पाटील, सचिव सुरेश पाटील, खजिनदार भागवत महाजन, संचालक मोहन पाटील, वसंत महाजन, भागवत वेडू महाजन, किशोर पाटील, अमोल महाजन, तिलक चौधरी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, पोलिस पाटील जगदीश नमायते, गावातील प्रतिष्ठित मान्यवर, विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामस्थ, तरुण वर्ग, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन अर्चना पाटील तर आभार के.एम.पाटील यांनी मानले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !