ठाकरे कुटूंबियांनी नाशिकमध्ये काळाराम मंदिरात घेतले दर्शन


The Thackeray family visited the Kalaram temple in Nashik नाशिक :  नाशिकमध्ये सोमवारी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आदींनी काळाराम मंदिरात जावून दर्शन घेतले. अयोध्येतील श्री राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर आता देशभरात ठिकठिकाणी रॅली, दीपोत्सव साजरा करण्यात आला. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरेंनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. त्याठिकाणी पूजा करून महाआरतीही केली.

रूद्राळ माळ कायम जपली
यावेळी उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील रूद्राक्ष माळेने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीत रूद्राक्षाची माळ कायम जपली. तीच परंपरा पुढे घेऊन उद्धव ठाकरे पुढील प्रवास करणार का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नाशिकच्या काळाराम मंदिरात ठाकरे कुटुंबाने प्रभू श्री रामांची आरती केली. तसेच आपल्या देशात महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी प्रभू श्रीरामांचरणी नतमस्तक होऊन उद्धव ठाकरेंनी साकडे घातल्याचे सांगण्यात येत आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !