आमदार एकनाथराव खडसे कार सेवेला गेल्याचे पत्रच व्हायरल


The letter of MLA Eknathrao Khadse going to car service is viral मुक्ताईनगर : तुम्ही कारसेवेला जायला तुमचं वय काय होतं? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना केल्यानंतर फडणवीस यांनी कारसेवेला गेल्याचा पुरावाच सादर केला तर दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील राजकारणातील हेवी वेट नेते नाथाभाऊ यांचे कार सेवेला गेल्याचे 34 वर्षांपूर्वीच पत्रकच व्हायरल झाले आहे.

म्हणून खडसेंची पत्रिकाही झाली व्हायरल
आमदार एकनाथराव खडसे यांनी 1990 मधील एक पत्रिका दाखवली आहे. त्यात आमदार एकनाथ खडसे असा नाथाभाऊंचा उल्लेख आहे. या पत्रिकेत जळगाव जिल्ह्यातील कारसेवकांची नावे आहेत. त्यात नाथाभाऊंचं नाव आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर कारसेवला जात असतानाच फोटो टाकताच खडसेंकडूनही कारसेवक म्हणून उल्लेख असलेली पत्रिका व्हायरल करण्यात आली आहे.



34 वर्षांपूर्वीची पत्रिका
ही पत्रिका 34 वर्षापूर्वीची आहे. श्रीराम कार सेवा समिती आणि विश्व हिंदू परिषदेने हे पत्रक काढलं आहे. या पत्रकारवर चलो अयोध्येचं आवाहन करण्यात आलं आहे. या पत्रिकेत 19 सप्टेंबर 1990 ते 7 ऑक्टोबर 1990पर्यंतचा कार्यक्रम देण्यात आला आहे. 15 सप्टेंबर 1990 ते 25 सप्टेंबर 1990 पर्यंत जनसंकल्प दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात सभा, युवक मेळावे, महिला मेळावे आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर 29 सप्टेंबर 1990 रोजी म्हणजे विजया दशमीच्या दिवशी विजय यात्रा समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवशी प्रत्येक तालुक्यातून विजययात्रा काढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. तर, 29 सप्टेंबर 1990 ते 7 ऑक्टोबर 1990 दरम्यान श्री प्रभू राम ज्योती यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !