भुसावळातील भोळे महाविद्यालयात आरोग्याबाबत जनजागृती
Public awareness about health in Bhole College, Bhusawal भुसावळ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास विभाग व युवती सभा आयोजित आत्मनिर्भर युवती अभियान कार्यक्रम अंतर्गत पालिका दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी युवतींच्या आरोग्यासंबंधी जनजागृती याविषयी मार्गदर्शन केले. युवतींनी सकस आहारासह फळे, हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करण्यासह नियमित व्यायाम करावा व फास्टफूड पासून दूर राहण्याचे आवाहन केले.
महाविद्यालयात युवतींच्या एच.बी.तपासणीसाठी कॅम्प लावण्यात आला. त्यात महाविद्यालयातील पन्नास युवतींची तपासणी करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी युवतींनी आपले आरोग्य ही सर्वात महत्वाची संपत्ती आहे व ती जपणे आवश्यक असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अनुजा चौधरी तर आभार अल्फा अख्तर शेख यांनी मानले. युवती सभा सचिव प्रा.संगीता धर्माधिकारी, समिती सदस्य डॉ.जे.पी.सरोदे, डॉ.ए.के.पाटील, प्रा.एस.एन.चौधरी, डॉ.माधुरी पाटील, प्रा.एन.एस.वानखेडे, गायत्री नेमाडे उपस्थित होत्या.








