आमदार रोहित पवार सुप्रीया सुळेंसह ईडी कार्यालयात दाखल


MLA Rohit Pawar along with Supriya Sule entered the ED office मुंबई : ईडीने बजावलेल्या नोटीसीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासोबत ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले.

काळ संघर्षाचा मात्र सत्याचा विजय होणार
यावेळी माध्यमांपुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सध्याचा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. परंतु मला खात्री आहे की, सत्याचा विजय होणार. आव्हानांवर मात करून आम्ही विजय मिळवू.



आम्ही मराठी आहोत घाबरत नाही – रोहित पवार
आम्ही मराठी आहोत आम्ही घाबरत नाही असे रोहित पवार म्हणाले. ईडीच्या अधिकार्‍यांना सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !