मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणारच : मनोज जरांगे-पाटील


Marathas will get reservation only from OBC: Manoj Jarange-Patil पुणे : कोणीही आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण मिळणार असल्याचा दावा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे. मंगळवारी पहाटे अडीचच्या दरम्यान कारेगाव रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे मनोज जरांगे-पाटील यांची सभा झाली. उच्च शिक्षण व नोकरीत टक्का वाढवायचा असेल तर आरक्षण महत्त्वाचे आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे आरक्षणाशिवाय पर्याय नाही, असेही जरांगे-पाटील म्हणाले.

आता आरक्षणाशिवाय परतीचा प्रवास नाही
जरांगे-पाटील म्हणाले की, सकल मराठा समाजाने मुंबईकडे कूच केली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नाही. प्रत्येकवेळी सरकारने समाजाची फसवणूक केली आहे. पहिल्यांदाच मराठ्यांमध्ये एकजूट झाली आहे. यातही फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी काही जण देव पाण्यात बुडवून आहेत. अशीच एकी पुढे राहिली तर जगामध्ये मराठा समाज प्रगत म्हणून पुढे येईल. समाजाला मी मायबाप मानले आहे. शांततेत आंदोलन केल्याने ते यशस्वी झाले. समाजाला सोडून एकट्याने चर्चा केली नाही. मी समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही, मराठ्यांची पोरं क्लास वन अधिकारी झाली पाहिजेत, आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !