काँग्रेसला मोठा धक्का : माजी खासदार डॉ.उल्हास पाटील कन्या डॉ.केतकी पाटील व शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात
डॉ.केतकी पाटील रावेर लोकसभेच्या दावेदार ? : आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे
Big blow to Congress : Former MP Dr. Ulhas Patil daughter Dr. Ketki Patil and hundreds of workers in BJP मुंबई : काँग्रेसमधून निलंबित झालेले माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी कन्या डॉ. केतकी पाटीलसह व शेकडो कार्यकर्त्यांसह बुधवार, 24 रोजी दुपारी दोन मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, आमदर मंगेश चव्हाण आदींच्या उपस्थितीत भाजपा पक्षात प्रवेश केला. दरम्यान, पाटील कुटूंबांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात दाखल झाल्यानंतर काँग्रेसला खिंडार पडले असून आगामी काळात मोठी समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. डॉ.केतकी पाटील यांच्या प्रवेशाने त्या रावेर आगामी लोकसभेच्या दावेदार असल्याची चर्चा रंगत आहे. पक्षश्रेष्ठी नेमका काय निर्णय घेतात? याकडे आता लक्ष लागले आहे.
काँग्रेसला पडले खिंडार
बुधवारी भाजपा पक्षात प्रवेश करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील व जळगाव लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी वाहनांद्वारे मुंबईत दाखल झाले होते. यावेळी डॉ.उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.








