भुसावळ शहरातील 150 वर्ष प्राचीन श्री राम मंदिरावर कलशाची स्थापना
Installation of Kalash at 150 years old Shri Ram temple in Bhusawal city भुसावळ : अयोध्योतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून भुसावळ शहरातील राम मंदिर वॉर्डातील लक्ष्मी चौकात स्थित दीडशे वर्ष ब्रिटिशकालीनपूर्व सार्वजनिक प्राचीन श्रीराम मंदिरावर कलशाची स्थापना ट्रस्ट आणि हिंदू जागरण मंच, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, 22 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंद या वैश्विक मुहूर्तावर करण्यात आली. 150 वर्षानंतर कलश स्थापना, अभिषेक होम हवन 18 जोडप्यांच्या हस्ते करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाचे पौरोहित्य श्रीराम मंदिराचे पूजारी अतुल देशपांडे, जितेंद्र आठवले, संजय बोचरे गुरुजी, श्रीकांत घिरणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. या मंदिराच्या घूमट निर्मितीसाठी आणि कलश स्थापना ही लोक सहभागातून करण्यात आली. मंदिराचे कलश रोहन आस्था सुंदर कांड परिवाराचे मुख्य गायक सुनील लाहोटी, स्वामी नारायण मंदिराचे संत यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी भुसावळचे आमदार संजय सावकारे, हिंदू जागरण मंचचे जिल्हा संयोजक अॅड.योगेश बाविस्कर, तालुका संयोजक मुन्ना ठाकूर, डॉ.सूर्यभान पाटील, उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या संचालिका डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, माजी नगरसेवक निर्मल कोठारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहर संचालक डॉ.विरेंद्र झांबरे, नमा शर्मा, विनोद शर्मा, मनोज बियाणी, निळकंठ भारंबे, किरण महाजन, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गजानन पडघण, बब्बल सेठ ठेटी, इंजिनियर प्रमोद सिंह आदींच्या उपस्थितीत करण्यात आली.


रेल्वे बॅण्डतर्फे मानवंदना
याप्रसंगी रेल्वेच्या बॅण्ड पथकाकडून श्रीराम मंदिराच्या कलश रोहन सोहळ्याला वंदना करण्यात आली. श्रीराम मंदिर परीसरात मंगल वाद्यांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीकृष्ण मंदिर इस्कॉन, भुसावळ यांच्या पथकाने श्रीराम मंदिरात सुंदर राम भजन गायले. त्रिपदी परिवार भुसावळच्या सर्व महिला मंडळाने भजनी म्हटली. बालकलाकार नुपूर भालेराव हिने प्रभू श्रीरामाच्या मंदिरामध्ये कथक नृत्याद्वारे श्रीरामांना वंदना सादर केली. श्रीराम मंदिर परिसरामध्ये गुरुद्वारा सभा भुसावळतर्फे लंगर प्रसाद व्यवस्था करण्यात आली.
यशस्वीतेसाठी श्रीरामचंद्रजी संस्थानच्या अध्यक्षा सरीता चौक, संचालक राधेश्याम लाहोटी, हिंदू जागरण मंच जिल्हा संयोजक अॅड.योगेश बाविस्कर, मंचचे हिंमत ठाकूर, शिशिर जावळे, महेश भालेराव, हरी अग्रवाल, कैलाससिंग चव्हाण, प्रशांत जाधव, रीतेश जैन, चंद्रशेखर पाटील, रीतेश जैन, जितेंद्र चिप्पड, आरएसएसचे पंकज चौक, प्रदीप पाटील, हरी अग्रवाल आदींनी परीश्रम घेतले.






