यावल शेतकी संघ निवडणुकीत माघारीनंतर एक जागा बिनविरोध

16 जागांसाठी 31 उमेदवार रिंगणात : दोन पॅनलची समोरासमोर लढत


One seat uncontested after withdrawal of Yaval Ketthi Sangh elections यावल : यावल शेतकी संघाच्या सार्वत्रिक निवडणुकीत 17 जागांसाठी दाखल 84 उमेदवारी अर्जापैकी मंगळवारी माघारीच्या दिवशी तब्बल 53 उमेदवारांनी माघार घेतली. माघारीनंतर ओबीसी राखीव जागेवरील भाजपाचे उमेदवार नारायण चौधरी हे बिनविरोध ठरले. उर्वरीत 16 जागांकरीता आता 31 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपा, शिंदे गटसेना व अजित पवार राष्ट्रवादीच्या सहकार पॅनल व काँग्रेस, सेना उबाठा व राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या शेतकरी पॅनलची समोरासमोर लढत होणार आहे.

यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात संघाच्या 17 जागांकरीता मुदतीत तब्बल 88 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते तर मंगळवारी बाजार समितीच्या आवारात असलेल्या सहायक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात सहकार अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी नंदकिशोर मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत होती. या मुदतीत तब्बल 53 उमेदवारांनी माघार घेतली व यात ओबीसीच्या राखीव एका जागेकरीता भाजपाचे नारायण चौधरी हे बिनविरोध ठरले आहेत. आता 16 जागांकरीता येथे निवडणूक होत आहे. या निवडणुकीत दोन पॅनलची समोरा समोर लढत होणार आहे. 4 फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार मतदान होईल. 5 फेब्रुवारी रोजी मतमाजेणी होईल. सोसायटी मतदार संघात 48 मतदार असून व्यक्तीशा मतदारसंघात दोन हजार 825 मतदार आहेत.



असे आहेत पॅनल
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार व सेना उबाठा यांचे शेतकरी पॅनलचे नेतृत्व माजी आमदार रमेश चौधरी करीत आहेत तर भाजपा, शिवसेना शिंदे व राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या सहकार पॅनलचे नेतृत्व भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, भाजपा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !