यावल तालुक्यात मराठा कुटुंबीयांचे ऑनलाईन सर्वेक्षणाकरीता प्रगणकांना प्रशिक्षण
Training of enumerators for online survey of Maratha households in Yaval taluka
यावल : यावल तहसील कार्यालयाततहसीलदार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले. तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीमधील 87 गावात असलेल्या चार हजार 509 मराठा कुटुंबांचे प्रगणकांच्या माध्यमातून ऑनलाईन सर्वेक्षण केले जाणार आहे. त्याच्या नोंदी शासनाकडून तयार करण्यात आलेल्या एका प्रश्नावलीद्वारे ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत. यासाठीची तहसील कार्यालयात एक दिवशीय प्रशिक्षण पार पडले.
मराठा समाजाला आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेवरून यावल तालुक्यातील मराठा कुटुंबांची माहिती घेण्यात येणार आहे. शासनाकडून तयार करण्यात आलेल्या प्रश्नावली एका विशेष अॅपध्ये ऑनलाईन सर्वेक्षण होणार आहे. याकरीता प्रगणक नेमण्यात आले आहे. या सर्व प्रगणकांना यावल तहसील कार्यालयात एक दिवशीय प्रशिक्षण देण्यात आले. नोंदी घ्यायच्या कशा ? याची माहिती देेण्यात आली व लागलीच तालुक्यातील 67 ग्रामपंचायतीत असलेल्या 87 गावात असलेल्या चार हजार 509 मराठा समाजाच्या कुटुंबांचे ऑनलाईन सर्वेक्षण करण्यास सुरवात झाली.
यांची प्रशिक्षणप्रसंगी उपस्थिती
तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी, लियाकत तडवी, मंडळाधिकारी मिलिंद देवरे यांच्या माध्यमातून प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रोजेक्टरच्या माध्यमातून ऑनलाईन मोबाईल अॅपमध्ये कशा प्रकारे सर्वेक्षण नोंदी घ्यायच्या आहेत याची संपुर्ण माहिती प्रगणकांना देण्यात आली व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.


इतर समाजाचेही सर्वेक्षण
मराठा समाजाच्या कुटुंबीयांचे सर्वेक्षण करतांना त्या0त्या गावातील इतर समाज कोणता आहे, त्यांची आर्थिक, समाजिक परीरस्थिती कशी आहेे. याची देखील माहिती या अनुषंगाने घेतली जात आहे. नागरीकांनी सर्वेक्षणाला सहकार्य करीत योेग्य माहिती प्रगणकांना द्यावी, असे आवाहन तहसिलदार मोहनमाला नाझीरकर यांनी केले आहे.
असे आहेत नोडल अधिकारी
ग्रामीण भागात होत असलेल्या सर्वेक्षणाचे नोडल अधिकारी म्हणून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर आहेत. काही तक्रार असल्यास त्यांच्या कार्यालयाशी संपर्क साधता येईल तर यावल शहरासाठी नोडल अधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी हेमंत निकम तर फैजपूर शहरासाठी नोडल अधिकारी म्हणून फैजपूर पालिकेचे मुख्याधिकारी काम पाहत आहे.






