यावल शहरात भरड धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ


Inauguration of bulk grain purchase center in Yaval city यावल : शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या पुरवठा गोदामात शासकिय हमीभाव असलेल्या भरड धान्य (ज्वारी) खरेदी केंद्राचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांची ज्वारी क्रम निहाय येथे खरेदी केली जाणार आहे. यंदाच्या खरीप हंगामातील ज्वारी खरेदीकरीता शासनाकडे हमीभाव असलेल्या शासकीय भरड धान्य (ज्वारी) खरेदी केंद्र सुरू करण्याकरीता कोरपावली येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीकडे काम सोपवण्यात आले होते.

या सोसायटीत शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. नोंदणी केल्यानंतर खरेदी कधी सुरू होईल? याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना लागली होती. शनिवारी यावल तहसील कार्यालयाच्या सातोद रस्त्यावरील शासकिय गोदामात भरडधान्य खरेदी केंद्राचे उद्घाटन शासकीय गोदाम व्यवस्थापक वाय.डी.पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी धान्य खरेदीस आणलेल्या शेतकरी लिलाधर सुधाकर झांबरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व खरेदीस सुरवात करण्यात आली.



यांची होती उपस्थिती
प्रसंगी कोरपावली संस्थेचे उपाध्यक्ष सुधाकर नेहेते, संचालक यशवंत फेगडे, पंकज नेहेते, ललित महाजन, दत्तात्रय महाजन, वसंत महाजन, इमरान पटेल, महेंद्र नेहेते, संस्थेचे सचिव मुकूंदराव तायडे, कर्मचारी नेमीचंद महाजन, योगेश साळुंके, चेतन चौधरी, रमजान तडवी उपस्थित होते. ऑनलाईन नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांची ज्वारी शासकिय हमीभावात क्रम निहाय या ठिकाणी खरेदी केली जाईल, असे कोरपावली संस्थेचे चेअरमन राकेश फेगडे म्हणाले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !