वरणगावात वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन
वरणगाव : वरणगाव शहरातील तिरंगा सर्कल येथे संविधानाच्या मूल्यांची जनजागृती करण्यासाठी संविधान उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले. तत्पूर्वी वरणगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केले. प्रास्ताविक प्रा.राहुल जोहरे यांनी तर आभार पंकज जोहरे यांनी केले.
यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
यशस्वितेसाठी कुणाल इंगळे, नरेंद्र इंगळे, सिद्धांत इंगळे, विजयानंद सुरवाडे, भीमराव निकम, मयूर वानखेडे, ज्ञानेश्वर जोहरे, अशोक इंगळे, अल्केश जोहरे, मकुंदा धरंधरे, आकाश तायडे, बाळू बोडदे, अनिकेत निकम, वैभव पालवे, कल्पेश जोहरे, कुणाल सोनवणे, रेवत सपकाळे, गौरव इंगळे, प्रबोध सुरवाडे, नंदू कांबळे, हर्षल बागुल, आकाश बोदडे, अजय मेढे, पप्पू मगरे, संघर्ष इंगळे, इतर कार्यकर्त्यांनी यांनी परीश्रम घेतले. प्रा.अजित कलवले, डॉ.नितीन इंगळे, डॉ.अशोक चित्ते, डॉ.सुरेश बच्छाव आणि शहरातील इतर नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








