मराठा समाजाला आरक्षण : यावलला मराठा समाजबांधवांकडून फटाके फोडून जल्लोष


Reservation for Maratha community : Yavala Maratha community burst firecrackers and cheered यावल : मराठा आरक्षणासंदर्भात मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास यश मिळाल्याबद्दल यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील भुसावळ टी पॉईंटवर फटाके फोडून व पेढे आणि लाडू वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी समाज का नेता कैसा हो मनोज जरांगे जैसा हो, एक मराठा लाख मराठा, तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ- जय शिवराय या घोषणांनी परीसर दणाणला होता. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मनोज जरांगे यांचे गेल्या सहा महिन्यापांसून सुरू असलेल्या आंदोलनाला यश मिळाल्याचे सांगून मराठा समाजाच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागणीला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती
आनंदोत्सवात माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, प्रा.मुकेश येवले, जिल्हा बँकेचे संचालक विनोदकुमार पाटील, मराठा सेवा संघ अध्यक्ष अजय पाटील, अ‍ॅड.देवकांत पाटील, बापू जासूद, अतुल भोसले, अतुल यादव, निलेश पवार सह मोठ्या संख्येत मराठा समाजबांधव सहभागी झाले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !