भुसावळातील 48 वर्षांच्या जुन्या आठवणींना मिळाला उजाळा

भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा


48 years old memories got light भुसावळ : शाळेतील मस्ती, एकत्रीतपणे केलेला अभ्यास, शिक्षकांचा विद्यार्थ्यांवरील वचक, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. निमित्त होते ते भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात 1975 सालात दहाव्या वर्गात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे. शनिवार, 27 रोजी सकाळी नऊ वाजता के.नारखेडे विद्यालयात 1975 यावर्षीच्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साही वातावरणात पार पडला. 50 माजी विद्यार्थी विद्यालयात उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे माजी विद्यार्थी म्हणून सुद्धा या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांच्या अर्धांगिनी अर्चना मकरंद नारखेडे यादेखील उपस्थित होत्या. अनेक माजी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी आपल्या मनोगतातून जुन्या स्मृतींना उजाळा देत शाळेप्रती ऋण व्यक्त केले. संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे यांनी विद्यालयातील शिक्षकांकडून विद्यालयाला प्रगतीपथावर नेण्याचे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी परीश्रम करण्याचे आवाहन केले. माजी विद्यार्थ्यांना सुवर्ण पालवी या मासिकाचे व दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले.



यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
माजी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी स्वतःचा परीचय दिला. विद्यालयाचे मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, ज्येष्ठ पर्यवेक्षक वाय.एन.झोपे, दामू खडसे व्यासपीठावर उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या प्रती ऋण व्यक्त करण्यासाठी विद्यालयाला उपयुक्त भेटवस्तू देण्यास अनुकूलता दर्शविली. सूत्रसंचालन एस.डी.वासकर यांनी केले. यशस्वीतेसाठी ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक, बी.बी.जोगी, मंगेश पाटील, एस.पी.महाजन, व्ही.सी.खडसे यांनी परीश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !