हतनूर धरणाच्या आवर्तनामुळे भुसावळ शहराचा पाणीप्रश्न सुटला

बंधार्‍याला गळतीची डोकेदुखी : उन्हाळ्यापूर्वीच व्यापक नियोजनाची आवश्यकता


The water problem of Bhusawal city has been solved due to the diversion of Hatnoor Dam भुसावळ :भुसावळ शहरवासीयांची पाण्याची चिंता मिटली असून नुकतेच हतनूर धरणातून आवर्तन सोडण्यात आले आहे. रविवारी पहाटे बंधार्‍यात हे आवर्तन पोहोचले असून त्यामुळे शहरवासीयांना टंचाईच्या झळा आता जाणवणार नाहीत. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तापी नदीपात्रातील बंधार्‍याची जलपातळी घसरल्यानंतर हतनूर धरणातून रविवारी आवर्तन सोडण्यात आले आहे.

पहिल्याच आवर्तनात नासाडी
हतनूर धरणात पालिकेचा वार्षिक 18 दशलक्ष घनमिटर जलसाठा आरक्षीत आहे मात्र शहरासाठी ठोस जलस्त्रोत नाही. केवळ बंधार्‍यातून पाणी उचलून पुरवठा केला जातो. गेल्या दहा वर्षांत या बंधार्‍याची डागडूजी व उन्हाळ्यापूर्वी उंची वाढविण्याचे काम केले मात्र पालिकेने कायमस्वरुपी उपाययोजना केली नाही. दरम्यान यंदाच्या पावसाळ्यानंतर पालिकेला पहिले आवर्तन मिळाले मात्र बंधार्‍याच्या दक्षिणेकडील भागाला भगदाड पडल्याने पाण्याची नासाडी होत असल्याने व्यापक उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे.



व्यापक डागडूजीची अपेक्षा
तापीपात्रातील बंधार्‍यावर रेल्वे विभागाची मालकी असल्याने तापीतील बंधार्‍याची डागडूजी किंवा उंची वाढविण्यापूर्वी रेल्वेची परवानगी घ्यावी लागते. रेल्वे प्रशासन मात्र तांत्रिक बाबी तपासून उंची वाढविण्याची परवानगी देते. अधिक उंची वाढून जलसाठा अधिक प्रमाणात झाला तर बंधारा फुटू शकतो, यामुळे सव्वा ते दीड फुटांपेक्षा अधिक उंची वाढवता येत नाही मात्र किमान डागडूजी तरी करणे गरजेचे आहे. हा बंधाराही आता जीर्ण झाल्याने व्यापक प्रमाणात डागडूजी गरजेची आहे. पालिकेने तापी नदीतील बंधार्‍याचे रि जॅकेटींग करण्याचे नियोजन केले होते मात्र पालिकेने हा प्रस्ताव रेल्वेला दिला नाही. सध्या केवळ उत्तरेकडील भागातील किरकोळ डागडूजी करण्यात आली मात्र आता दर्शनी अर्थात उत्तरेकडील भागात गळती लागली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !