मराठा समाज आरक्षण : राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन सर्वेक्षणाला दोन दिवस मुदतवाढ
Extension of two more days to conduct survey in the state Decision of the State Backward Classes Commission मुंबई : राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज सर्वेक्षणासाठी दोन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन सर्वेक्षण सुरू असून मंगळवारच्या ऑनलाईन बैठकीत मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. मंगळवारी दुपारी तीन वाजता या बैठकीला सुरुवात झाली.
सर्वेक्षणात येताच अनेक अडचणी
या बैठकीत सध्या सुरू असलेल्या सर्वेक्षणाबाबत चर्चा झाली. गेल्या काही दिवसापासून हे सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी पुण्यातील गोखले इन्स्टिट्युटकडून सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. सर्वेक्षण करताना अनेक अडचणी येत असल्याची काही अधिकार्यांनी तक्रारी केल्या होत्या. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल लवकरात लवकर कसा करता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली.


राज्यातील मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पण या सॉफ्टवेअरमध्ये अनेक ठिकाणी अडचणी आल्याने त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.






