डॉ.रविंद्रकुमार सिंगल नागपूरचे आयुक्त तर अमितेशकुमार पुण्याचे आयुक्त
Dr.Ravindrakumar Singal is the Commissioner of Nagpur and Amitesh Kumar is the Commissioner of Pune नागपूर : क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारे नागपूरचे अमितेश कुमार यांची पुणे पोलीस आयुक्त म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ.रविंद्रकुमार सिंगल यांची बदली करण्यात आली आहे. सिंगल यांचे नाव नागपूर शहरासाठी अनेक दिवसांपासून चर्चेत होते व ही चर्चा खरी ठरली आहे.
गृहमंत्र्यांच्या शहरात सिंगल यांची नियुक्ती
उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृहशहर असलेल्या नागपुरात कुणा अधिकार्याची वर्णी लागते? याकडे लक्ष लागून असतानाच बुधवारी सायंकाळी निघालेल्या बदली आदेशात रवींद्रकुमार सिंगल यांच्याकडे पोलीस आयुक्तपदाची धुरा आली आहे.


अमितेश कुमार यांच्या नावावर अनोखा रेकॉर्ड
पोलीस आयुक्त अमितेशकुमार हे सप्टेंबर 2020 रोजी नागपुरात रुजू झाले होते. नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलिस आयुक्तपदी राहण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाला आहे. तीन वर्ष पाच महिने ते या पदावर होते. त्यांच्या कार्यकाळात 2020, 2021 मध्ये गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यात मदत मिळाली होती. फेब्रुवारी 2023 हा महिना तर एकही हत्येची नोंद न झालेला महिना ठरला होता.






