भुसावळातील कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य : शहरचे नूतन पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे


Priority for law and order in Bhusawal : City’s new police inspector Sandeep Ranadive भुसावळ : पोलिस ठाण्यात काम घेवून आलेल्या नागरीकांची फरफट होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यासह कायदा-सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य राहणार असल्याची ग्वाही भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे नूतन निरीक्षक संदीप पोपट रणदिवे यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना दिली.

रात्रीची गस्त प्रभावी करणार
शहरचे निरीक्षक गजानन पडघण यांची बाजारपेठ पोलिस ठाण्यात बदली झाल्यानंतर रणदिवे यांची शहरसाठी नियुक्ती करण्यात आली होती. बुधवारी त्यांनी तत्कालीन निरीक्षक गजानन पडघण यांच्याकडून पदभार स्वीकारला. यावेळी कर्मचार्‍यांनी रणदिवे यांचे स्वागत केले. याप्रसंगी रणदिवे म्हणाले की, आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने उपद्रवी प्रवृत्ती हद्दपार करण्याबाबत उपाययोजना केल्या जातील तसेच चोर्‍या-घरफोड्या रोखण्यासाठी रात्रीची गस्त वाढवण्यात येईल तसेच प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्यावरही आपला भर असेल, असे त्यांनी सांगितले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !