आज जागतिक छायाचित्रण दिन : भुसावळ फोटोग्राफर असोशियनतर्फे सामूहिक कॅमेरा पूजन
भुसावळ : जागतिक छायाचित्रकार दिनानिमित्त भुसावळ फोटोग्राफर्स असोसिएशनच्या वतीने सामूहिक कॅमेरा पूजन कार्यक्रम विश्वकर्मा मंदिर, म्युन्सीपल पार्क येेथे सोमवार, 19 रोजी सकाळी नऊ वाजता होत आहे. अध्यक्षस्थानी आमदार संजय सावकारे असतील. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष रमण भाऊ भोळे, माजी नगराध्यक्ष युवराज भाऊ लोणारी आदींची व ज्येष्ठ छायाचित्रकारांची उपस्थिती लाभणार आहे. भुसावळ फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर येथे पूरग्रस्त नागरीकांना मदतीसाठी संपूर्ण भुसावळ तालुक्यातील छायाचित्रकार आपापल्या परीने मदत निधी जमा करणार असून खारीचा वाटा उचलणार आहेत व जमलेला निधी मुख्यमंत्री निधी मध्ये जमा करणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष आनंद ठाकरे कळवतात.
उद्या फॅमिली गेट टुगेदर
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी असोसिएशनचे अध्यक्ष आनंद ठाकरे, उपाध्यक्ष बबलू बराटे, सचिव राहुल पाटील, सहसचिव राजीव भंगाळे, कोषाध्यक्ष अजय शिंपी, कमिटी मेंबर निलेश कोलटकर, अतुल शिंदे, अविनाश तडस महेंद्र बार्हे, विनोद गोर्हे, कमलेश चौधरी, सचिन काकडे व सर्व असोसिएशनचे सदस्य परीश्रम घेत आहेत. दरम्यान, मंगळवार, 20 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता सर्व छायाचित्रकार बांधवांचा स्टार रीसॉर्ट सिनेमा येथे फॅमिली गेट-टुगेदर व मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येकाने आपले नाव सचिव राहुल पाटील यांच्याकडे नोंदवावे, असे कळवण्यात आले आहे.