रावेर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसनेही केला दावा

ताकदीच्या उमेदवारामुळे जागा काँग्रेसला हवी : पक्षश्रेष्ठींकडे मागणी


Congress also claimed Raver Lok Sabha constituency भुसावळ : रावेर लोकसभा निवडणूक उंबरठ्यावर आली असताना ही जागा काँग्रेस की राष्ट्रवादीला जाणार हा प्रश्न असतानाच काँग्रेसने मात्र या जागेवर दावा करीत मातब्बर उमेदवारांना संधी देण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. रावेर लोकसभा मतदार संघात मराठा, मुस्लिम, लेवा समाजाचे प्राबल्य असल्याने ही जागा काँग्रेसला सोडण्यात यावी, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी केली आहे. लवकरच जागेचा तिढा सुटणार असल्याने ही जागा आता कुणाच्या वाटेला जाणार? याकडे लक्ष लागले आहे.

अपवाद वगळता मतदार संघात काँग्रेसची पकड
पदाधिकार्‍यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केलेल्या मागणीनुसार, रावेर लोकसभा हा मतदासंघ राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. हा मतदारसंघ काँग्रेस प्रणित विचारांचा मतदासंघ आहे. या मतदार संघात पक्षाची ताकत इतर पक्षांपेक्षा जास्त असून मतदार संघातील रावेर विधानसभा व मलकापूर विधानसभेवर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व आहे. काँग्रेसचे आमदार त्या ठिकाणी आहेत तर रावेर मलकापूर या ठिकाणी नगराध्यक्ष काँग्रेसचे आहेत.



2019 मध्ये उल्हास पाटलांचा विजय
2019 मध्ये काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची उमेदवारी माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांना ऐनवेळी फार्म भरण्याचे दोन दिवस आधी जाहीर झाली होती व मतदारांनी भरभरून मतदान रुपी आशीर्वाद दिल्याने तीन लाख 19 हजार मते घेवून उल्हास पाटील विजयी झाले होते.

हे आहेत काँग्रेसचे दावेदार
समाजनिहाय मतदारांचा विचार करीत पक्षाने उमेदवारी दिल्यास मराठा समाजाचे जळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमेटीचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप सुरेश पाटील, लेवा समाजाचा विचार केल्यास आमदार शिरीष चौधरी, भुसावळचे माजी आमदार नीळकंठ फालक, मलकापूरचे डॉ.अरविंद कोलते, प्रतिभा शिंदे व मुस्लिम समाजाचा विचार करता मतदार संघात तब्बल तीन लाख 75 हजार मुस्लीम मतदार आहेत. गेल्या 30 वर्षांपासून काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मो.मुनव्वर खान, माजी प्रदेश सचिव अ‍ॅड.सलीम पटेल यांना उमेदवारी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली.

पक्ष श्रेष्ठी घेणार निर्णय
इंडिया आघाडीमुळे सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ईतर पक्ष मिळून या जागेवर सहज काँग्रेस उमेदवाराचा विजय शक्तय आहे. ही जागा काँग्रेसलाच द्यावी, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खरगे, एआयसीसीचे महासचिव खासदार मुकुल वासनिक, महाराष्ट्रचे प्रभारी चैन्नी तलाजी व प्रांत अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !