छत्रपती संभाजी नगरातून लांबवलेली बस धुळ्यात सापडली
A long bus from Chhatrapati Sambhaji Nagar was found in dust धुळे : धुळे गुन्हे शाखेने छत्रपती संभाजी नगरातून चोरलेल्या बसला धुळ्यातून ताब्यात घेतले आहे. या बस चोरल्यानंतर चोरट्यांनी धुळ्यातील चाळीसगाव चौफुलीजवळ विठ्ठल नगरात आणून सोडल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कळताच त्यांनी पथकाला बस ताब्यात घेण्याच्या सूचना केल्या.
पाच लाखांची बस सोडून चोरटा पसार
सिडको पोलीस ठाणे हद्दीतून पाच लाख रुपये किंमतीची बस (एम.एच.20 डी.डी.0195) चोरट्यांनी लांबवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. ही बस धुळ्यात आणून सोडल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर बस ताब्यात घेण्यात आली व अधिक तपासार्थ सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.





