शरद पवारांना मोठा धक्का : राष्ट्रवादीचे चिन्ह व नाव अजित पवार गटाला

निवडणूक आयोगाच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ


Big blow from Sharad Pawar: NCP symbol and name to Ajit Pawar group मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही निवडणूक आयोगाच्या निकालानंतर मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचं चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटानेही दावा सांगितल्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेल्यानंतर हा निर्णय झाला.

शरद पवारांना मोठा धक्का
लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. शरद पवार गटाला आता निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागणार आहे.



दहा वेळा सुनावणी अन् चिन्ह अजित पवार गटाला
भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्यावरून शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मतभेद झाले. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांचा विरोध झुगारून महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे 41 आमदार अजित पवारांसोबत गेले तर उर्वरित आमदारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. दोन्ही गटांनी पक्षावर दावा सांगितल्याने अखेर हे प्रकरण निवडणूक आयोगासमोर गेले. आयोगासमोर तब्बल 10 वेळा झालेल्या सुनावणीनंतर मंगळवारी निवडणूक आयोगाने अजित पवारांचा गट हाच मूळ राष्ट्रवादी पक्ष असल्याचं सांगत पक्षाचं चिन्हही त्यांना दिलं आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !