भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयास उत्कृष्ट आयोजन पुरस्कार


भुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात तहसील कार्यालय आणि भोळे महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चौदाव्या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

विविध घटकांचाही सत्कार
प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, नायब तहसीलदार अंगद आसटकर, तालुका गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे आणि भुसावळ नगरपरीषदेचे उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजनासाठी उत्कृष्ट आयोजन पुरस्कार 2023 साठी दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी शहरातील विविध घटकांचाही सत्कार करण्यात आला. या आधीही शैक्षणिक वर्ष 2022-2023 मध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षांच्या निकालासाठी भोळे महाविद्यालयाच्या (कॅप) ऑनलाईन परीक्षा पेपर तपासणी केंद्रास उत्कृष्ट केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांचे सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले असल्याचे प्रसिध्दीप्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी कळविले आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !