सत्ताधार्‍यांची पत्रकार परीषद म्हणजे विरोधकांना बदनाम करण्याचे षडयंत्र

बोदवडला राष्ट्रवादी शरद पवार गटातील नगरसेवकांचा आरोप


The ruling press council is a conspiracy to defame the opposition बोदवड : सत्ताधारी नगसेवकांनी लावलेल्या सर्व आरोपांचा राष्ट्रवादी शरद पवार गटातील नगरसेवकांनी खंडण करीत हा प्रकार म्हणजे विरोधकांना बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे म्हटले. चार दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पत्रकार परीषद घेत काही आरोप केले होते. या सर्व आरोपांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक यांनी खंडन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचच्या नगरसेवकांनी आमच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे, असेही नगरसेवक म्हणाले.

बेकायदेशीर कामांना विरोध
यावेळी पत्रकार परीषदेत नगरसेवक म्हणाले की, कायदेशीर कामे होत नाहीत, एका प्रभागातील निधी दुसर्‍या प्रभागात वळवला जातो कामाचे, स्पॉट व्हेरीफेशन होत नाही, कामांना शासकिय मान्यता नसते त्यामुळे आम्ही अशाच कामांना विरोध केला आहे. कामाची गुणवत्ता नसल्याने आम्ही कोणत्याही समाजाच्या सभागृहाला किंवा सुशोभीकरणाला विरोध केला नाही, सत्ताधारी रस्त्याच्या कामांना प्राधान्य देत असून पाणीपुरवठा योजनांच्या कामाला प्राधान्य नाही त्यामुळे हम करे सो कायदा असे काम सुरू आहे. त्यांच्या कोणत्याही विकास कामात गुणवत्ता नाही, महत्वाचे कागदपत्र नगरपंचायतीत सुटीच्या दिवशी जातात, असा आरोप करीत अग्निशामक गाडी वैयक्तिक ठिकाणी वापरली जाते व ती मार्केट मुल्यांकनांपेक्षा दुप्पट किंमतीत घेतली जाते, फिरत्या शौचालयाची आवश्यकता नसताना अधिकची रक्कम देवून खरेदी केले जाते, घंटागाड्या धुळ खात आहेत. घनकचरा ठेक्याचा लोकसंख्येच्या नियमानुसार आठ लाख रुपये प्रतिमहिना असताना 12 लाख रुपये प्रतिमहिना दिला जातो, घरकुल लाभार्थींना अनुदान मिळत नाही, शहरात लाखो रुपयांची कामे ओव्हरलँपिग होत आहेत, असा आरोपही करण्यात आला. साडेचार वर्षात आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीला केवळ बासष्ट लाखांचा निधी दिला तर नाथाभाऊंनी मात्र साडेचार महिन्यात सवा कोटींचा निधी दिला मात्र हा निधी खर्च करण्यात मान्यता मिळत नाही, असेही नगरसेवक म्हणाले.



यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
पत्रकार परीषदेला राष्ट्रवादी गटनेता जाफर शेख, नगरसेवक भरत अप्पा पाटील, दीपक झाबंड, शेख मुज्जमिल शहा, लतीफ शेख, नगरसेविका योगीता खेवलकर, पूजा पारधी, हकिम बागवान, प्रदीप बडगुजर, किरण वंजारी, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !