संक्रांतीला वाण म्हणून दिले सॅनिटरी पॅड : जळगावातील निधी फाउंडेशनने पाडला आदर्श पायंडा


Sankranthi given as a variety of sanitary pads : Nidhi Foundation in Jalgaon laid the ideal foundation जळगाव : संक्रांतीचा सण म्हटला म्हणजे महिलांच्या उत्सवातील एक महत्त्वाचा दिवस. आपल्याकडे संक्रांतीला घरोघरी सुवासिनी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करीत एकमेकींना वाण देतात. 90 च्या दशकात एखादी लहानशी वस्तू भेट दिली जात होती. अलीकडच्या काळात प्लॅस्टिकच्या वस्तू देण्याचा ट्रेंड वाढला आहे. मुळात संक्रातीच्या सणानिमित्त होणारा हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे आपल्या आचार-विचारांचा स्नेहमेळावा असतो. भेटीगाठी होत असल्याने मने जुळतात आणि दुरावा कमी होतो. संक्रांतीच्या हळदी कुंकवाला एक आधुनिक टच देत जुन्याट विचारांना दूर सारून एक नवीन पायंडा रुजविण्यासाठी निधी फाउंडेशनच्या माध्यमातून एक आगळेवेगळे हळदी कुंकू आयोजन करण्यात येते. संक्रांतीचा या उपक्रमात सुवासिनींसोबतच विधवा भगिनींचा देखील सन्मान राखला जातो. महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि समाजाच्या दृष्टीने नाजूक असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. आपल्या समाजात आजही मासिक पाळी विषयावर बोलायला कुणीही तयार होत नाही, नेमके हेच विचार दूर सारण्याचा विचार निधी फाउंडेशनने केला आहे.

वाण म्हणून सॅनिटरी पॅड भेट
निधी फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू समारंभात भेटीसाठी आलेल्या प्रत्येक महिलेला सॅनिटरी पॅड भेट म्हणून देण्याचा पायंडा आम्ही पाडला. निधी फाउंडेशन आयोजित उपक्रमाला दरवर्षी महिला भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पुरुष वर्गाकडून देखील कौतूक होत आहे. मासिक पाळी शाप नसून वरदान असल्याचा संदेश या हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून देण्यात येतो. नुकतेच माझ्या मोठ्या जाऊबाई संगीता विसपुते यांच्या घरी हळदी कुंकूनिमित्त गेली असता विशेष म्हणजे त्याठिकाणी प्रत्येक महिलेला वाण म्हणून सॅनिटरी पॅड देण्यात आले ते पाहून मन खूप आनंदित झाले. भविष्यात देखील असे उपक्रम घरोघरी राबविले जातील, असा आम्हाला विश्वास असल्याचे जळगावातील निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली विसपुते म्हणाल्या.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !