यावल पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांची नियंत्रण कक्षात बदली : हरीष भोये यांच्याकडे पदभार


Yaval police inspector Rakesh Mangaonkar transferred to control room : Harish Bhoye to take charge यावल : यावल पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक राजेश मानगावकर यांची तडकाफडकी पोलिस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रभारीपदी रावेरचे सहाय्यक निरीक्षक हरीष भोये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

दहिगावातील परीस्थितीच्या अनुषंगाने कारवाई
यावल तालुक्यातील दहिगाव येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीनंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून सहायक जिल्हाधिकारी तथा फैजपूरचे प्रभारी उपविभागीय अधिकारी अर्पित चौहान यांनी दहिगावात गुरूवार, 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7.30 वाजेपासून 48 तासांसाठी संचारबंदी लागू केली आहे. अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठानेदेखील बंद ठेवण्यात आली आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (1) अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे.


दहिगावातील परीस्थितीनंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी यावल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांची जळगाव मुख्यालयातील नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. त्यांच्या जागी रावेर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये यांची तात्पुरता नियुक्ती करण्यात आली आहे. या वृत्ताला फैजपूरच्या सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी दुजोरा दिला.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !