राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध : भुसावळात भाजपा युवा मोर्चाकडून पुतळा दहन


Protest against Rahul Gandhi’s statement : Effigy burnt by BJP Yuva Morcha in Bhusawal भुसावळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ओबीसी समाजाबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या बेछूट वक्तव्याचा भुसावळातील भाजप व युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी निषेध केला. शुक्रवार, 9 रोजी सकाळी 11 वाजता सुरभी नगरातील आमदार संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडे मारून त्याचे दहन करण्यात आले. प्रसंगी राहुल गांधी व काँग्रेसच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी राहुल गांधी माफि मागा, इंडि आघाडी शेम-शेम आदी आशयाचे फलक झळकावण्यात आले.

यांची होती उपस्थिती
पुतळा दहनप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, श्रेयस इंगळे, युवा मोर्चा शहराध्यक्ष गौरव आवटे, सरचिटणीस लाजरस मणी, यशांक पाटील, उपाध्यक्ष क्रीश कोठारी, नागेश खरारे, संकल्प वाणी, सचिन बर्हाटे, लखन रणधीर, गोपीसिंग राजपूत, चेतन सावकारे, देवेंद्र फालक, सचित बोंडे, सुमित बर्हाटे, वैभव लोणारी, हिमांशु दुसाणे, योगेश वाघ, प्रशांत देवकर, भावेश चौधरी, प्रशांत भट, सागर जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !