भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात अर्थसंकल्पावर कार्यशाळा
भुसावळ : भुसावळ पीपल्स चॅरीटेबल संस्थेच्या दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात गुरुवार, 8 रोजी अर्थसंकल्प 2024 या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सीए मुकेश अग्रवाल उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. सीए मुकेश अग्रवाल यांनी बजेट विषयीच्या मार्गदर्शनात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या बजेटवर विस्तृत चर्चा केली.
प्राचार्यांनी बजेट सर्वांसाठी किती महत्त्वाचा विषय आहे व विद्यार्थ्यांसाठी बँकिंग क्षेत्रातील झालेल्या अमुलाग्र बदलाची तसेच त्यासंबंधी अर्थसंकल्पातील तरतुदी याची माहिती दिली. प्रास्ताविक डॉ.जे.पी.सरोदे तर सूत्रसंचालन प्रा.गायत्री नेमाडे तसेच आभार प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी मानले. प्रा.डॉ.डी.एस.राणे, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.संजय डी.चौधरी, प्रा.एस.एन.चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.ए.आर.सावळे, सुशीला भाट, आरती भोई, धनश्री नेहते व कामिनी चौधरी उपस्थित होत्या.








