फैजपूरातील धनाजी नाना महाविद्यालयातील विद्यार्थ्याची भारतीय नौदलात निवड


फैजपूर : धनाजी नाना महाविद्यालयातील दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीचा विद्यार्थी महेंद्र भोई याची भारतीय नौदलात स्किल टेक्निशियन म्हणून निवड झाली. याबद्दल त्याचा प्राचार्य डॉ.आर.बी.वाघुळदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. भोई हा गाते, ता.रावेर येथील मधुकर विठ्ठल भोई व यशोदाबाई भोई यांचा मुलगा आहे.

प्रतिकूल परीस्थितीवर मात करीत मिळवले यश
घरची प्रतिकूल परीस्थिती व तीनवेळा बारावीत अपयश आल्यानंतर चौथ्या प्रयत्नात बारावी सुटल्यानंतर बी.ए.ला धनाजी नाना महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर कळाले की येथे दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनी आहे. त्यात असंख्य मुलं रोज अभ्यास करतात हे एक उत्तम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे. त्याचवेळी संचालक उपप्राचार्य डॉएस.व्ही.जाधव यांना भेटल्यावर त्यांनी आयुष्याला वेगळी दिशा दिली. दहा रुपयात शिव भोजन थाळी घेवून उदरनिर्वाह केला व सतत दोन वर्ष रात्री काम करून दिवसा महाविद्यालयातील प्रबोधिनीच्या अभ्यासिकेत अभ्यास केला.



मार्गदर्शक तसेच उपलब्ध पुस्तके व मैदानी स्पर्धेसाठी डॉ.गोविंद मारतळे आदींचे मार्गदर्शन लाभले. या सुविधा नसत्या तर कदाचित हे यश ही मिळू शकले नसते म्हणून संस्थाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य आर.बी. वाघुळदे, प्रबोधिनीचे संचालक डॉ.एस.व्ही जाधव यांचे महेंद्र भोई याने विशेष आभार मानले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !