समरसता, सकारात्मक पत्रकारीता अपेक्षित : महामंडलेश्वर जनार्दन महाराज
Harmony, Positive Journalism Expected : Mahamandaleshwar Janardhan Hari Ji फैजपूर : लोकशाहीचा विश्वनीय चौथा स्तंभ म्हणजे पत्रकार. समरसता व सकारात्मक पत्रकारीतेची आवश्यकता आजच्या स्थितीला अपेक्षीत असल्याचे मत महामंडलेश्वर यांनी येथे व्यक्त केले. पत्रकार दिनानिमिताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व पत्रकार संस्था, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार सन्मान व नवरत्न पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम महामंडलेश्वर जनार्धन हरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
या मान्यवरांचा सन्मान
पत्रकार संस्थेतर्फे उपस्थित सर्व मान्यवर व पत्रकाराचा शाल स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक उल्लेखनीय कार्य करणार्यांना शाल सन्मानचिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ देत नवरत्न पुरस्काराने महामंडलेश्वरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. त्यात डॉ.शैलेंश खाचणे पांडुरंग सराफ, हाजी हारून शेख, जफर शेख, मलक शरीफ, इंजि.कसीम खाटीक, पवन सराफ, मोहमंद इलियास, डॉ.दानीश शेख आदी मान्यवरांचा नवरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आाल.


यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रसंगी विधी मंडळाचे ज्येष्ठ पत्रकार कमलाकर वाणी, एनएसयूआय प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी, श्रीराम पाटील, सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, प्राचार्य राजेंद्र वाघुळदे, माजी प्राचार्य एस.एस.पाटील, माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी, केतन किरंगे, राकेश जैन, कलीम मणियार, शेख कुर्बान, चंद्रशेखर चौधरी, माजी नगरसेवक शेख जफर संजय रल, माजी सैनिक गंगाधर कोळी, भाजपा शहराध्यक्ष अनंता नेहेते, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रीयाज, वसीम जनाब, मुदत्सर नजर, पत्रकार अरुण होले, वासुदेव सरोदे, संजय सराफ, ललित फिरके, नंदकिशोर अग्रवाल, वार्ता फाउन्डेशन अध्यक्ष मयुर मेढे, मलक शाकिर, राजु तडवी, सलीम पिंजारी, इदू पिंजारी, जावेद काजी आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा.डॉ.राजेंद्रसिंह राजपूत तर प्रास्ताविक संदीप पाटील यांनी केल.. यशस्वीतेसाठी पत्रकार संस्थाध्यक्ष फारूख शेख अमीर, उपाध्यक्ष दिलीप सोनवणे, सचिव श्याम पाटील, संघटक कृष्णा पाटील, सदस्य अजय महाजन, राजु पाटील, साजीस शेख, मुस्तकीन शेख, मोईनुद्दीन शेख जावेद शेख आदींनी परीश्रम घेतले.






