केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 15 रोजी जळगावात : दौर्‍यानिमित्त तयारीला वेग


Union Home Minister Amit Shah in Jalgaon on 15th : Speed ​​up preparations for the visit जळगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे 15 फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहे. या अनुषंगाने तयारीला वेग दिला देण्यात आला आहे.

युवा संमेलनानिमित्त शहा जळगाव दौर्‍यावर
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडी गतीमान झाल्या आहेत. यात भारतीय जनता पक्षाने आधीच मोर्चेबांधणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठिकठिकाणी सभा घेत असून ते आधी महाराष्ट्र दौर्‍यावर येऊन गेले आहेत. आचारसंहिता लागण्याच्या आधी ते जळगाव जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याची माहिती आधी समोर आली होती. साधारणपणे फेब्रुवारीच्या उत्तरार्धात मोदींचा दौरा असेल असे मानले जात होते. तथापि, आता याच्या आधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे जळगाव जिल्ह्यात येत आहेत.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवार, 15 रोजी अमित शाहा यांची जळगाव जिल्ह्यात बैठक होत आहे. ते युवा संमेलनानिमित्त जळगावात येत आहेत. यात ते युवकांना संबोधीत करणार आहेत. तसेच, याप्रसंगी काही मान्यवरांचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता देखील आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या दौर्‍याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !