सकारात्मक मानसिकता यशस्वीतेची गुरुकिल्ली : डॉ.युवराज परदेशी


Positive mindset is the key to success : Dr. Yuvraj Pardeshi बोदवड : सकारात्मक मानसिकता यशस्वीतेची गुरुकिल्ली असल्याचे मत कंटेंट ओशीयन प्रा.लि.चे संचालक व सहसंस्थापक डॉ.युवराज परदेशी यांनी येथे व्यक्त केले. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शनिवारी आयोजित ‘उद्योगाकडून स्वावलंबनाकडे’ वाटचाल या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले.

गरज निर्माणानंतर समाधानासाठी नवीन संकल्पना जन्माला
डॉ.युवराज परदेशी यांनी नवयुवकांना स्टार्टटप, युनिकॉर्न म्हणजे काय, त्याची सुरूवात कशी करता येईल तसेच विद्यार्थ्यांना छोट्या-छोट्या उद्योगांची कशी सुरुवात करता येऊ शकते याबद्दल अतिशय सोप्या शब्दात माहिती दिली. आपल्या आजूबाजूला डोळसपणे बघितल्यावर लोकांच्या गरजेतून जेव्हा नवीन कल्पना येतात, त्यातून बाजारपेठ कशी काबीज करता येईल, आपली कंपनी कशी मोठी होईल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. गरज निर्माण झाली तरच समाधानासाठी नवीन संकल्पना जन्माला येते, असे ते म्हणाले. त्याचा पाठपुरावा करून उपाय निघतो आणि त्यातूनच एक नवनिर्मिती होऊन ती स्वतःच्या व इतरांच्या कशी उपयोगी पडते याचे अनेक उदाहरणं देखील त्यांनी दिले.



तर देशाची अर्थव्यवस्थाप मजबूत
प्रा.अरविंद चौधरी यांनी विद्यार्थ्यांना स्टार्ट अप इंडिया या उपक्रमाचे फायदे समजावून सांगितले तसेच नाविण्यपूर्ण उद्योगांचे महत्त्व सांगितले. इच्छाशक्ती , प्रयत्न व मेहनतीची जोड आणि सोबत योग्य मार्गदर्शन असेल तर युवकांच्या संकल्पनेला चालना मिळेल आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असेही ते म्हणाले.

यशस्वीतेसाठी यांचे परीश्रम
प्रास्ताविक डॉ.गीता पाटील यांनी तर सूत्रसंचालन कंचन दमाडे यांनी व आभार डॉ.नरेंद्र जोशी यांनी मानले. यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.विनोद चौधरी, डॉ.रत्ना जवरास, डॉ.चेतनकुमार शर्मा, नितेश सावदेकर, डॉ.ईश्वर म्हसलेकर, युवराज आठवले, अमर वाघमोडे, अनिल धनगर, शरद पाटील, अजित पाटील, राजू मोपारी, जितेंद्र बडगुजर, अतुल पाटील, समीर पाटील यांनी परीश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !