भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियन प्रथम स्थानी


Bhusawal Ordnance Factory Workers Union First भुसावळ : ऑर्डनन्स फॅक्टरीत सरकार संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार संरक्षण क्षेत्रात कार्यरत संघटनांचे व त्यांचे महासंघाचे सदस्य पडताळणी करण्यासाठी मतदान घेण्यात आले. त्यात परंपरागत ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियन 35 टक्के मतदान घेऊन प्रथम क्रमांकावर निवडून आली. त्याखालोखाल अनुक्रमे आयुध निर्माणी कर्मचारी संघ दुसर्‍या, मजदूर युनियन इंटक व बहुजन सुरक्षा कर्मचारी संघटना तिसर्‍या व चौथ्या स्थानी राहिली.

स्थानिक स्तरावर ऑर्डनन्स फॅक्टरी कामगार युनियन ही सर्वात जुनी व पहिली युनियन आहे.


यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
महासचिव व जेसीएम- 3 दिनेश राजगिरे यांच्या नेतृत्वात सदस्य सत्यपनाची निवडणूक झाली. महेंद्र पाटील, निलेश देशमुख, आशिष मोरे, किशोर बढे, आर.एन.जैन, मोहन सपकाळे, दीपक भिडे, योगेश आंबेडकर, गिरीष येवले, मिलेश देवराले, मामा बाविस्कर, योगेश जोशी, नितीन देशमुख, एन.डी.पाटील, संजय लोखंडे, नितीन पाटील, रवी सपकाळे, दीपक वाघ, धनंजय पिंपळे, वेदांत पाटील, हितेंद्र पाटील, दीपक पाटील, गणेश तायडे, किशोर कोळी, विनोद धाडे, हरीश बाविस्कर, जावेद तडवी, राहुल चौधरी आदींनी कामगार युनियनला प्रथम क्रमांकाची संघटना करण्यासाठी परीश्रम घेतले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !