भाजपात प्रवेश करणार का ? आमदार एकनाथराव खडसे यांनी मांडली ही भूमिका


Will you join BJP? MLA Eknathrao Khadse presented this position भुसावळ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथराव खडसे हे पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या आठवड्यापासून सुरू आहेत शिवाय दिल्लीत भाजपा श्रेष्ठींशी गाठीभेटी झाल्याच्या चर्चा झडत असताना जळगावात मंत्री गिरीश महाजनांनीदेखील आमदार खडसे यांचे भाजपात येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचा दावा केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या अनुषंगाने आमदार एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मात्र भाजपा प्रवेशाबाबत कुठलाही विचार नसल्याचे म्हटले आहे.

भाजपातील अन्यायानंतर खडसेंचा राष्ट्रवादीत झाला होता प्रवेश
एकनाथराव खडसे यांना भोसरी येथील कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणात जून 2016 मध्ये राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर त्यांना 2019 मध्ये उमेदवारी देखील नाकारण्यात आली होती तर त्यांच्या जागी तिकिट मिळालेल्या त्यांची कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे यांचाही पराभव झाला होता. भाजपामध्ये होत असलेल्या अन्यायाच्या पार्श्वभूमीवर आमदार एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर आमदार खडसेंची विरोधी गटनेता पदी निवड झाली तर आमदारकीही मिळाली होती शिवाय कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यात आले.


मंत्री महाजन म्हणाले, भाजपात येण्यासाठी जोरदार प्रयत्न
आमदार खडसे यांचे भाजपात येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असून केंद्रासह राज्याकडूनही आपल्याला ही बाब कळाली असल्याचे मंत्री गिरीश महाजन जळगावात म्हणाले आहेत. आपल्याला मात्र त्याबाबत विचारणा झालेली नाही, असेही ते म्हणाले. खडसेंना घ्यायचे की नाही याबाबत मला काही विचारणा झाली नाही कदाचित मी छोटा कार्यकर्ता असेल त्यामुळे असे असू शकेल मात्र खडसेंची कदाचित वरुन हॉट लाईन असल्यास त्यांनी निश्चित प्रयत्न करावेत, असेही मंत्री महाजन उपरोधिकपणे म्हणाले.

राष्ट्रवादीत आल्यानंतरही अडचणी थांबेना
राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही आमदार खडसेंच्या अडथणी थांबलेल्या नाहीत. अलीकडेच अवैध गौण खनिज प्रकरणी खडसे कुटूंबाला 137 कोटी रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे.

भाजपा प्रवेशाबाबत खडसे म्हणाले तसे काहीही नाही
आमदार एकनाथराव खडसे यांच्याशी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ प्रतिनिधीने संवाद साधला असता ते म्हणाले की, आपला भाजपात जाण्याचा कोणताही विचार नाही किंवा आपल्याला तशी ऑफरही नाही.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !