भुसावळ रेल्वे स्थानकासमोरील तो ‘कोच कॅन्टींगचा डबा’ अखेर हटवला
The ‘coach canting box’ in front of Bhusawal railway station was finally removed भुसावळ : रेल्वे प्रशासनाने शहरातील रेल्वे स्थानकासमोर कोच कॅन्टींग सुरू करण्याचा निर्णय घेत सदर ठेका हा जालना येथील एकाला दिला होता मात्र मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक आर.के.यादव यांनी स्टेशनच्या समोार कॅन्टींग सुरू न करण्याच्या सूचना केल्यानंतर काम बंद करण्यात आले असलेतरी महिना उलटूनही कोच कॅन्टीसाठी आणलेला डबा तसाच पडून होता. परीणामी शिवरायांच्या पुतळ्याचे तसेच उद्यानाचे सौंदर्य प्रवाशांना पाहण्यास अडचण येत होती व नाराजी व्यक्त करण्यात येत होती. रेल्वे डीआरएम ईती पांडे यांनी ही बाब गांभीर्याने घेत तातडीने कोच कॅन्टीनचा डबा हटवत त्याचा लिलाव केला तर संबंधित ठेकेदाराचे कंत्राटही रद्द केले आहे. या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
कंत्राट रद्द : कोच कॅन्टीनचा लिलाव
भुसावळ रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागासमोर रेल्वे प्रशासनाकडून कोच कॅन्टींग तयार करण्यात येत होती. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून निविदा काढून येथे कोच कॅन्टींगचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र मध्य रेल्वेचे महा व्यवस्थापक यादव यांनी भुसावळ स्थानकाची व परीसराची पाहणी केल्यानंतर नाराजी व्यक्त करीत कोच कॅन्टींगचे सुरू असलेले काम बंद करण्याच्या सूचना केल्यात. संबंधित ठेकेदाराने या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केल्यानंतर त्याची समजूत काढण्यात आली तर डीआरएम ईती पांडे यांनी तातडीने कोच कॅन्टीन हटवत त्याचा लिलाव केला आहे शिवाय संबंधित कंत्राटदाराचा कंत्राट रद्द केल्याची माहिती जनसंपर्क विभागाने दिली आहे.


उद्यानाचे सौंदर्य खुलवणार : डीआरएम
डीआरएम ईती पांडे ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ शी बोलताना म्हणाल्या की, कोच कॅन्टीन हटवल्यानंतर आता उद्यानाचे सौंदर्य अधिक खुलवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. उद्यानात हिरवीगार झाडे लावून रेल्वे स्थानक परीसर अधिक प्रसन्न करण्यावर आपला भर असेल.






