यावल तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या 13 जागांसाठी पोटनिवडणूक


By-elections for 13 seats of 12 gram panchayats in Yaval taluka यावल : यावल तालुक्यातील 12 ग्रामपंचायतीच्या विविध कारणांमुळे रीक्त असलेल्या 13 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या दृष्टिकोनातून प्रारूप मतदार यादी तयार केली जात आहे व ही प्रारूप मतदार यादी बुधवार, 14 फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार असून त्यावर 20 फेब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहे.

13 जागांसाठी निवडणूक
यावल तालुक्यात विविध कारणाने रीक्त असलेल्या 12 ग्रामपंचायतीत 13 सदस्यांच्या जागा आहेत. या 13 सदस्यांच्या जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे. यासाठी या सर्व प्रभागाच्या प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम तहसील कार्यालयामध्ये सुरू करण्यात आले आहे. प्रारूप मतदार याद्या तयार केल्यानंतर त्या 14 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केल्या जातील. प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप मतदार याद्यांवर 20 फेब्रुवारीपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत. प्राप्त हरकतींवर निपटारा केल्यानंतर 23 फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, लिपिक सुयोग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केल्यानंतर लवकरच या सर्व ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.



या गावात आहे सदस्य पद रीक्त
पिंप्री येथे दोन सदस्य तर पाडळसा, सांगवी बुद्रुक, वढोदे प्र.सावदा, हिंगोणा, पिळोदे खुर्द, बामणोद, बोरावल खुर्द, नायगाव, गिरडगाव, आडगाव व शिरसाड या गावात प्रत्येकी एक सदस्य पद रीक्त असून 12 ग्रामपंचायतीच्या 13 जागा रीक्त आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !