पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भारताची महासत्तेकडे वाटचाल : जिल्हाध्यक्ष अमोल जावळे
India is moving towards superpower due to Prime Minister Narendra Modi: District President Amol Jawle भुसावळ : भारतीय जनता पार्टीतर्फे गाव चलो, घर चलो अभियान भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या उपस्थितीत वरणगाव शहरातील 21 बुथवर राबवण्यात आले. 21 बुथवर स्वतः जिल्हाध्यक्ष यांनी जाऊन सविस्तर केंद्र राज्य सरकारच्या योजनेची माहिती देऊन पत्रके वाटून बैठका घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात केलेला सर्वागीण विकासाचा पाढा जनतेसमोर मांडला. अनेक गरीब लोकांच्या योजना या कल्याणकारी असून गरीबांना जास्तीत-जास्त होतो शिवाय योजनांचा लाभ देताना कधीही नरेंद्र मोदी यांनी हिंदू मुस्लिम जातख धर्म पहिला नाही शिवाय मोंदीमुळे देशाची महासत्तेकडे वाटचाल सुरू असल्याचे मत जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी वरणगाव शहरातील सर्व बूथ समितीच्या बैठकीत व्यक्त केले.
अनेकांनी केला भाजपात प्रवेश
यावेळी बुथवर दिवार लेखन जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी 220 ते 241 बूथ वर स्वतः जाऊन पूर्ण बैठका घेतल्या. जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याहस्ते समाजसेविका सविता माळी, कलाबाई माळी, सरू वाघमारे, जवरे, डॉ.योगेश भालेराव, डॉ.प्रशांत पाटील यांच्यासह महिलांनी व युवकांनी भाजपात प्रवेश केला.


यांची होती उपस्थिती
प्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुनील काळे, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्हाटे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, कामगार नेते मिलिंद मेढे, तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर, ज्येष्ठ नेते जिल्हा अल्लाउद्दीन शेठ, डॉ.सादिक, रमेश पालवे, गोलू राणे, आकाश निमकर, मिलिंद भैसे, हितेश चौधरी, नाना चौधरी, बळीराम सोनवणे, डॉ.प्रवीण कुमार चांदणे, छोटू सेवातकर, अरुण बावणे, महिला आघाडी शहराध्यक्ष प्रणिता पाटील, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रुख्मिणी काळे, संतोष कश्यक, कृष्णा महाजन, कुंदन माळी, मुस्लिम भाई अन्सारी, कायदे आघाडी जिल्हा सरचिटणीस अॅड.ए.जी.जंजाले, अनिल वंजारी, शंकरअण्णा पवार, राहुल जंजाळे, अरुण बावणे, रमेश पालवे, शेख फहिम, कादिर सेठ अलीम भाई, गोविंदा गावंडे, नंदू जोशी, शालिग्राम डोयासे, नामदेव पहेलवान, एकनाथ पहेलवान, संतोष पाटील, सुशील झोपे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.






