यावल शहरात उद्या तालुकास्तरीय चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन
यावल : शहरातील साने गुरूजी विद्यालयात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात ‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा ’ या उपक्रमाचे औचित्य साधून शिक्षण विभाग, पंचायत समिती तसेच यावल तालुका कलाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय भव्य चित्रकला प्रदर्शन मंगळवार, 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता होत आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
उद्घाटन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कला शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस शालिग्राम भिरुड यांच्याहस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीकर असतील. प्रमुख अतिथी म्हणून यावल नगरपरीषदेचे मुख्याधिकारी हेमंत निकम, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड, जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष एन.ओ.चौधरी, यावलचे गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष अजय पाटील, सचिव अरुण सपकाळे, चोपडा येथील ललित कला केंद्राचे सेवानिवृत्त प्राचार्य राजेंद्र महाजन, खिरोदा येथील सप्तपुट ललित कला भवनचे प्राचार्य अतुल मालखेडे आदी मान्यवर उपस्थित असतील. कलाप्रेमींनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन यावल तालुका कलाध्यापक संघाचे अध्यक्ष विजय नन्नवरे, उपाध्यक्ष चंदन भालेराव, अनिल वंजारी, कार्याध्यक्ष हितेंद्र धांडे, सचिव संतोष वानखेडे, सहसचिव कैलास पवार यांच्यासह तालुक्यातील सर्व कलाध्यापक यांच्यावतीने करण्यात आले आहे.








