माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचा आज भाजपात प्रवेश !


Former Chief Minister Ashok Chavan joins BJP today ! मुंबई : काँग्रेसमधून बाहेर पडत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दोन दिवसात भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगितले होते शिवाय भाजपात जाणार का? याबाबत त्यांनी त्या पक्षाची कार्यप्रणाली माहिती नसल्याची माहिती दिल्यानंतर मंगळवारी मात्र चव्हाण यांचा भाजपात प्रवेश होत असल्याची माहिती समोर आली आहे. पक्ष प्रवेश होत असल्याने भाजपच्या कार्यलयात जय्यत तयारी सुरु आहे.

दुपारी होणार प्रवेश सोहळा
मंगळवारी दुपारी 12 वाजता अशोक चव्हाण यांच्यास अमर राजूरकर यांचा पक्षप्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या उपस्थितीत होईल.



तर मिळू शकते राज्य सभेची उमेदवारी
अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. कारण, अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश आधी 15 फेब्रुवारी रोजी होणार होता पण अचानक घाईघाईमध्ये त्यांचा पक्ष प्रवेश होत आहे. राज्यसभेसाठी नामांकन देण्याची अखेरची तारीख एका दिवसावर आली आहे, त्यामुळे राज्यसभेवर जाण्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !