केंद्रीय यंत्रणांच्या दबावामुळे अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडला ; चेन्निथलांची टिका


Ashok Chavan left the party due to pressure from central agencies ; Criticism of Chennithala मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांच्या दबावामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्याची टिका रमेश चेन्निथला यांनी केली. ते म्हणाले की, जे लोक डरपोक आहेत, तेच पक्ष सोडत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग होणार नाही, काँग्रेसच्या कोणत्याही आमदाराने असे केल्यास त्याला सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात येईल. चव्हाण यांच्या जाण्याने पक्ष अजिबात कमकुवत होणार नाही, कार्यकर्ते काँग्रेससोबत आहेत, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी चेन्निथला म्हणाले.

भाजपामध्ये अशोक चव्हाण होणार क्लीन
ज्या विरोधी पक्षाच्या नेत्यांवर भाजपने गंभीर आरोप केले होते त्यांच्यासाठी भाजपने दरवाजे उघडले आहेत, अजित पवारांचा 60 हजार कोटींचा सिंचन घोटाळा, अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळा आदी प्रकरणांनंतरही हे नेते आता भाजपमध्ये ते क्लिन होणार आहेत. भाजप वॉशिंग मशिनप्रमाणे काम करत आहे, असा टोलाही चेन्निथला यांनी लगावला.



काँग्रेसने अशोक चव्हाण यांना सर्व दिले
अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षाने सर्वस्व दिले, त्यांना दोनदा मुख्यमंत्री केले, ते सीडब्ल्यूसीचे सदस्य होते तरीही ते निघून गेले असंही चेन्निथला म्हणाले. महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह अनेक पक्षाचे नेते उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !