भुसावळातील अल्पसंख्यांक वस्त्यांमध्ये सुविधांची वाणवा
Distribution of facilities in minority settlements in Bhusawal भुसावळ : शहरात अल्पसंख्याक मुस्लिम विकास योजने अंतर्गत अल्पसंख्यांक वस्तीत तुटलेल्या शौचालयासह पुलाची दुुरुस्ती करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, प्रशासक व पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष मो.मुनव्वर खान यांनी निवेदन देत सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे शिवाय महाराष्ट्र सरकारने यंदा अल्पसंख्यांक मुस्लिम विकास योजने अंतर्गत 700 कोटींचे बजेट मुस्लीम वस्तीच्या विकासासाठी मंजूर केले असताना गेल्या 25 वर्षांपासून मुस्लीम वस्तीत सुविधा पुरवण्यात आल्या नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
यांची निवेदन देताना उपस्थिती
गेल्या 25 वर्षांपासून शहरातील मुस्लीम अल्पसंख्यांक वस्तीत गटारी तुटलेल्या, पूल नाही तसेच नसरवांजी फाईल, जाम मोहल्ला, आर.के.किताब घर ते डी.एल.हिंदी हायस्कूल, खडका रोड, गौसीया नगरातील रस्ते खराब झाल्याचे रोड इतके खराब झाले आहे की रस्त्याने पायी चालणेही कठीण आहे. या भागातील नसरवांजी फाईल, मिल्लत नगर, आगाखान वाडा भागातील पुलाच्या दोन्ही बाजूंनी भिंत तुटल्याने जिवीतहानी होण्याची भीती आहे. वेळीच दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. निवेदन देताना मो.मुन्वर खान यांच्यासह
सलीम गवली, जिल्हा सचिव हमीद शेख, सेवा दलाचे शहराध्यक्ष संजय खडसे. जगपालसिंग गिल, जॉनी गवळी, शैलेश अहिरे उपस्थित होते.








