कौटूंबिक वादातून पत्नीचा खून : आरोपी पतीला बेड्या ; शिरपूर तालुक्यातील घटना


Murder of wife due to family dispute : Accused husband in chains ; Incidents in Shirpur Taluka शिरपूर : शिरपूर तालुक्यातील साकर्‍यापाडा गावात कौटूंबिक वादानंतर पतीने पत्नीची हत्या केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित पसार झाला होता मात्र त्यास पोलिसांनी अटक केली आहे. मदलीबाई नंदा पावरा (55) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून नंदा डेड्या पावरा (साकर्‍यापाडा) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. संशयिताला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

असे आहे खून प्रकरण
फत्तेपूर-मांजगोपाडा रस्त्याजवळील साकर्‍यापाडा गावात पावरा कुटूंब वास्तव्याला होते. 11 रोजी कौटुंबिक वाद वाढल्यानंतर संशयित नंदा पावरा याने पत्नी मदलीबाईचा खून केला होता. खुनाची घटना समोर देऊ नये म्हणून नंदा पावरा वाने मदतीबाईचा मृतदेह खाटेवर ठेवून झाकून ठेवला तसेच पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दाम्पत्याचा मुलगा संजय
पावरा (29) याने तक्रार दिल्यावरून शरपूर तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांच्या पथकाने वाडी शिवारातील जंगलातून नंदा पावराला अटक केली.






यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या शोध पथकातील रफिक मुल्ला, संतोष पाटील, संजय चाण, मोहन पाटील, रणजित वळवी, कृष्णा पावरा, शिवाजी वसावे यांनी केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !