भुसावळ भाजपाच्या विधानसभा जैन प्रकोष्ठ समन्वयकपदी चेतन जैन
Bhusawal BJP Vidhan Sabha Jain Cell Coordinator Chetan Jain भुसावळ : भुसावळ भाजपाच्या विधानसभा जैन प्रकोष्ठ समन्वयकपदी चेतन जैन यांची निवड करण्यात आली. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार जैन प्रकोष्ठ प्रदेश प्रमुख संदीप भंडारी यांनी विधानसभा समन्वयक जाहीर केले आहेत. त्यात भुसावळातील शाकाहाराचे प्रणेते चेतन जैन यांची भाजपा जैन प्रकोष्ठ भुसावळ विधानसभा समन्वयकपदी निवड करण्यात आली.
चेतन जैन यांनी सामाजिक कार्यात वाहून घेतले असून त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल थेट प्रदेश प्रमुखांनी घेत त्यांना नियुक्तीपत्र दिले. आपल्या संघटन कौशल्याने जैन बांधवांना मुख्य प्रवाहात आणून संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच आपल्या माध्यमातून जास्तीत-जास्त जैन समाज जोडला जाईल, असा विश्वास ठेवून जैन यांची पक्षश्रेष्ठींकडून निवड करण्यात आली. चेतन जैन यांच्या निवडीनंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.








