भुसावळात परदेशी धोबी समाजातर्फे महिला मेळावा


Women’s gathering organized by foreign washermen society in Bhusawal भुसावळ : शहरातील तुळशीनगरात भुसावळ परदेशी धोबी समाजातर्फे महिला मेळाव्यासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन महिला अध्यक्षा पारोबाई परदेशी यांच्याहस्ते करण्यात आले. व्यासपीठावर उपाध्यक्ष नंदा परदेशी, सचिव हेमा सुरते, रंजना परदेशी, सरीता सुरते, नीता परदेशी, अ‍ॅड.संगीता परदेशी आदी उपस्थित होत्या. या महिला मेळाव्यात विविध विषयांवर समाजातील महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. समाजातील महिलांतर्फे विविध उपक्रम राबविले जातात. यावेळी समाजातर्फे महिलांना भेट वस्तू देण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास सरला सुरते, शोभा सुरते, प्रतिभा सुरते, छाया सुरते, राधा परदेशी, राणी सुरते, मिना परदेशी, कमलाबाई परदेशी, शोभाभाई परदेशी, शकुंतला परदेशी, ज्योती परदेशी, पूजा परदेशी, सुंदरबाई परदेशी, राखी परदेशी यांच्या समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !