संकटे पुन्हा पुन्हा येत असतील तर मार्ग बदलावा लागला तरी चालेल पण चालत राहा : भुसावळात महेंद्र मांडे


भुसावळ : आई-वडील हेच आपले व्हॅलेंटाईन देण्याचे आयकॉन आहेत. ते निस्वार्थपणे कोणतीही अपेक्षा न करता आपल्यासाठी झटत असतात. आपल्या आयुष्यात खूप अडचण येतील संकटे येतील मात्र त्यांना पाहून थांबू नका, पुन्हा कामाला लागा, संकटे पुन्हा पुन्हा येत असतील तर मार्ग बदलावा लागला तरी चालेल पण चालत राहा. सतत आपली अध्ययन करण्याची भूक चालू ठेवा, थांबू नका, असे मत सोनू मांडे यांनी येथे व्यक्त केले. शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा ज्ञानज्योत आदान-प्रदान व शुभेच्छा प्रदान कार्यक्रमात संस्थाध्यक्ष मांडे बोलत होते.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
यावेळी शाळेतील विद्यार्थिनी कादंबरी चौधरी, ललिता चौधरी, अक्षता देवडा, जयश्री सोनार यांनी शाळेविषयी भावना व्यक्त करून शाळेतील शिक्षक प्रकाश चौधरी, मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी यांनीही परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. दहावीच्या विद्यार्थिनीकडून शाळेला भेटवस्तू देण्यात आली. यानंतर ज्ञानज्योत आदान-प्रदान इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनीना प्रतिज्ञा देऊन प्रदान करण्यात आली. व्यासपीठावर संस्थाध्यक्ष सोनू (महेंद्र) मांडे, संचालक श्रीधर खनके, मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी व पर्यवेक्षक संजीव पाटील उपस्थित होते.



सूत्रसंचालन आशिष निरखे व वंदना ठोके तर परीचय काशीनाथ बारेला तर आभार प्रशांत देवरे यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी परीश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !