शिंदखेडा तालुक्यातील अल्पवयीन मुलीची हत्या : मारेकर्याचे नाव सांगणार्यास 50 हजारांचे बक्षीस
The murder of a minor girl in Shindkheda taluka: 50 thousand reward for the name of the killer शिंदखेडा : शिंदखेडा तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीची हत्या करण्यात आली होती मात्र हत्या करणार्या संशयिताला पकडण्यात अद्याप यंत्रणेला यश आलेले नाही. या तरुणीची अपहरण केल्यानंतर हत्या करण्यात आली असून मारेकर्याचे नाव सांगणार्यास 50 हजारांचे बक्षीस धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी जाहीर केले आहे. आरोपीचे नाव सांगणार्याचे नाव पोलिस प्रशासनाकडून गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रात नमूद आहे.
आरोपींच्या अटकेसाठी निघाला होता मार्चा
शिंदखेडा तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन तरुणीचा खून तिला गोणपाटात भरून विरदेल गावशिवारातील दादरच्या शेतात फेकून देण्यात आले होते. पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक करून फास्टट्रॅक न्यायालयात केस चालवून आदिवासी समाजाला न्याय द्यावा, या मागणीसाठी आदिवासी टायगर सेना व इतर आदिवासी संघटनांनी बुधवार, 14 रोजी दुपारी शिंदखेडा शहरात विराट मोर्चा काढण्यात आला होता. खूनाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयातून न्याय मिळावा व आरोपीस त्वरित अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी मोर्चेकर्यांनी केली होती.





मारेकर्याचे नाव सांगणार्यास 50 हजारांचे बक्षीस
अल्पवयीन तरुणीची हत्या करणार्याचे नाव पोलिसांना सांगणार्यास धुळे पोलिस अधीक्षकांनी 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे शिवाय पोलिसांना माहिती देणार्याचे नाव देखील गुप्त ठेवण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिरपूर पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी कळवले आहे.
