भुसावळातील डॉ.रती महाजन बिसारा लेडीज रनच्या सदिच्छादूत
Dr. Rati Mahajan Bisara from Bhusawla is the well wisher of Ladies Run भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशन आयोजित महिलांसाठीच्या रनच्या सदिच्छादूत डॉ.रती महाजन असतील. यासंबधीची घोषणा करण्यात आली व पत्र असोसिएशनच्या वतीने डॉ.तुषार पाटील, प्रवीण वारके, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील, डॉ.चारुलता पाटील यांनी डॉ.रती महाजन यांना दिले. यावेळी जळगाव रनर्सचे उमेश महाजन, विद्या बेंडाळे, वैशाली बडगुजर, चारुलता अजय पाटील, अनिता पाटील यांची उपस्थिती होती.
महिला सदस्यांसोबत धावणार
डॉ.रती महाजन या मूळच्या जळगाव येथील असून प्रसिद्ध त्वचाविकार तज्ञ आहेत. शिवाय त्या जळगाव रनर्स असोसिएशनच्या नियमित धावपटू आहेत. डॉ.रती महाजन या सदिच्छादूत म्हणून रविवार, 18 फेब्रुवारी रोजी भुसावळ रनर्सच्या महिला सदस्यांसोबत धावणार आहेत. त्या सर्व महिलांशी संवाद देखील साधणार आहे त्यामुळे रविवारी होणार्या सराव सत्रामध्ये शहरातील अधिकाधिक महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनच्या वतीने प्रा.प्रवीण फालक यांनी केले आहे.








