मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा राजीनामा
Resignation of Sarpanch of Bhota Gram Panchayat in Muktainagar Taluka मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील भोटा येथील महिला सरपंच किरण हरीदास भगत यांनी सरपंच पदाचा राजीनामा गटविकास अधिकारी यांच्याकडे सोपवला. भोटा येथील महिला सरपंच किरण हरिदास भगत यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निशा जाधव यांची भेट घेऊन आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला.
सदस्यांनी विकासकामांमध्ये अडथळा आणल्याचा आरोप
ग्रामपंचायत सदस्य गावात विकासकामे करण्यात वेळोवेळी अडथळा आणत असल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे. गावात विकासकामे आणून गावाचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करत असताना सोबत असलेले ग्रामपंचायत सदस्यच विकासकामात वारंवार अडथळा निर्माण करतात शिवाय मासिक मिटिंगमध्ये नेहमी गोंधळ घालणे, प्रोसिडिंगच्या कामात अडथळा आणणे, ज्या ठिकाणी निधी मंजूर आहे त्या ठिकाणी काम करण्यास मज्जाव आणून दुसर्याच ठिकाणी निधी वळविण्यासाठी दबाव आणल्याचा प्रकार सुरू असल्याने राजीनामा दिल्याचे किरण भगत यांनी सांगितले. पुढील सरपंचपदी कुणाची वर्णी लागणार? याकडे आता लक्ष लागले आहे.








