दोन गावठी कट्टे व काडतूसांसह धुळ्यातील तरुण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात


Two youths from local crime branch in Dhule with knives and cartridges धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने दोन गावठी कट्टे व दोन जिवंत काडतूसांसह धुळ्यातील संशयिताला पारोळा चौफुली भागातील हनुमान मंदिराजवळून बेड्या ठोकल्या. बालकिसन रेड्डी (22, विद्युत नगर, मिल परिसर, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात धुळ्यातील आझाद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

गोपनीय माहितीची टिप अन आरोपी जाळ्यात
धुळे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना पारोळा रोड चौफुलीवर मंदिराजवळ एक तरुण गावठी कट्ट्यासह येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले होते. पथकाने तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अंगझडतीत दोन कट्टे व दोन जिवंत काडतूस आढळल्याने तरुणाला अटक करण्यात आली तसेच दुचाकी (एम.एच.18 सी.बी.4429) जप्त करण्यात आली.






यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, कैलास दामोदर, कर्मचारी संजय पाटील, सुरेश भालेराव, प्रशांत चौधरी, रवीकिरण राठोड, सुशील शेंडे, नीलेश पोतदार, गुणवंत पाटील, हर्षल चौधरी आदींच्या पथकाने कारवाई केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !