भुसावळ बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड.तुषार पाटील यांची निवड
Election of Adv.Tushar Patil as President of Bhusawal Bar Association भुसावळ : भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयातील बार असोसिएशनची सार्वत्रिक निवडणूक 16 फेब्रुवारी रोजी उत्साही वातावरणात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड.तुषार पाटील हे पुन्हा दुसर्यांना विजयी झाले. बार आसोसिएशन भुसावळची दोन वर्षासाठी सार्वत्रिक निवडणूक पार पडली. 30 जानेवारी 2024 रोजी बार असोसिएशनच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. या अनुषंगाने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव कोषाध्यक्ष, ग्रंथपाल, महिला प्रतिनिधी या विविध पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत 414 मतदारांपैकी 341 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
दुसर्यांदा अॅड.तुषार पाटील यांची निवड
बार आसोसिएशनच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्ष म्हणून अॅड.तुषार एस.पाटील हे 268 मतांनी निवडून आले तर उपाध्यक्ष म्हणून अॅड.धनराज मगर हे 128 मते मिळवून विजयी झाले. सचिव म्हणून अॅड.विश्वंभर वाणी यांना 181 मते मिळाली. सहसचिव म्हणून अॅड. पुरुषोत्तम पाटील यांना 186 मते मिळाली. कोषाध्यक्ष म्हणून अॅड.विजय तायडे यांना 198 मते मिळाली तर ग्रंथपाल म्हणून अॅड.नूर मोहम्मद यांना 204 मते मिळाली. महिला प्रतिनिधी म्हणून अॅड.किर्ती सोनवणे यांना 183 मते मिळाले. बार असोसिएशन येथे झालेल्या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अॅड.अनिल आर.सावळे, अॅड.राजेश एस.कोळी, अॅड.विजय सी.तायडे व अॅड.दीपक कोळी यांनी कामकाज पाहिले.


कामाची पावती मिळाली
गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची पावती या निवडणुकीतून मला मिळाली आहे. कोरोना काळात वकीलांच्या पाठिशी उभा राहिलो होतो. त्याचेच मतरूपी त्यांनी आशीर्वाद दिले आहे. येत्या दोन वर्षात वकीलांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, वकील चेंबर, मेडिकल रिलीफ फंडसाठी काम करणार असल्याचे अॅड.. तुषार पाटील म्हणाले.






